आर्चीचा मरीन ड्राईव्हवर स्वॅग! साडीतल्या फोटोने वेधले लक्ष; दिल्या किलर पोझ; फोटो पाहून व्हाल घायाळ

Rinku Rajguru : सैराट सिनेमामुळे रिंकू राजगुरू रातोरात स्टार झाली. या सिनेमाने तिला मोठी प्रसिद्ध मिळवून दिली. यामुळे रिंकू महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहचली. या सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकूने अनेक सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये काम केले. ज्यामुळे आता ती सिनेमा इंडस्ट्रीतील एक नामांकित अभिनेत्री बनली आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकूचे नवे फोटो शूट चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.
रिंकूने हे फोटोशूट कोणत्याही स्टुडिओत केलेले नाहीतर चक्क मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात जाऊन केले आहे. तिचे हे नवे फोटोशूट चाहत्यांना खूपच आवडले असून, यामुळे आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अनेकांना वाटत आहे की हे फोटोशूट रिंकूच्या आगामी सिनेमासाठी करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये रिंकू खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे तेज लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
या फोटोशूटमध्ये रिंकूने फिकट केशरी रंगाची कॉटन साडी परिधान केली आहे. साधा मेकअप, हलकं जुळं बांधलेले केस आणि साडीचा पारंपरिक लूकमध्ये तिंच सौंदर्य आणखी खुलून आले आहे. सोशल मीडियावर रिंकू सक्रीय असून ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असते. स्वतःचे फोटोही ती शेअर करत असते.
रिंकू राजगुरूचे हे नवीन फोटो इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर)वर ट्रेंडिंगमध्ये आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक करत कमेंट्स वर्षाव केला जात आहे.
हेही वाचा : इतकी पटपट बोलली की….; नोरा फतेही इंग्रजी बोलण्यावरून झाली ट्रोल! व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा





