Pune Election : अर्चना तुषार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : आगामी निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २२ ‘क’ काशेवाडी डायस प्लॉटमधून अर्चना तुषार पाटील यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पाटील यांची सामाजिक बांधिलकीची, प्रशासकीय अनुभवाची आणि प्रभागातील सातत्यपूर्ण विकासकामांची दखल घेत पक्षाकडून त्यांना सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली.
तुषार पाटील, उत्तमराव जाधव, रजनी जाधव, अमर जाधव यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार उपस्थित होता. तसेच विक्रम खेनट, राहुल मोहिते, मनीषा गायकवाड, रेहान भाभी, मीरा बीघे आणि परवीन कोटालीया उपस्थित होते.
पाटील यांनी नगरसेविका म्हणून कार्यरत असताना त्यांनी रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रभावी काम केले. पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर तत्काळ उपाययोजना करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.
कोरोना काळात गरजू नागरिकांसाठी मदतीचे विविध उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान जपल आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ ‘क’ साठी विकासाभिमुख आणि विश्वासार्ह नेतृत्व देण्याचा संकल्प अर्चना पाटील यांनी व्यक्त केला आहे.





