अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली..! ब्लॅक कलरच्या फिटिंग ड्रेसमध्ये दिसला ‘सोनाली’चा मादक अवतार

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. सोनालीचे नुकतेच ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ आपल्या नवीन बोल्ड लूकने सर्वांना वेड लावत असल्याचे दिसून येत आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इंस्टग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड मादक दिसत आहे. यामध्ये सोनालीने ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच सोनालीने या फोटोला किलर पोझ दिली आहे. हे फोटो ब्लॅक ॲण्ड व्हाईट असून तिच्या सौदर्यांची जादू पाहायला मिळालीय.

यातील खास म्हणजे, सोनालीच्या नजरेने आणि सौदर्यांने चाहत्यांना भूरळ पडली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘In the beginning it was all black and white!’ असे लिहिले आहे. सध्या अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फॅन्स देखील तिच्या या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव