nagar | शहापूर -अकोले – नेवासा – गेवराई महामार्गाला मंजुरी द्या

नेवासा, (प्रतिनिधी) – शेवगाव –भेंडा कारखाना –नेवासा –श्रीरामपूर –बाभळेश्वर – लोणी –संगमनेर – अकोला –शेंडी यांना जोडणारा शहापूर येथे NH-८४८ (जुना NH-३)सह जंक्शनवर समाप्त होणारा गेवराई जवळील NH-52 (जुना NH-२११) वर महामार्गास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन केली
NH-52 (जुना) च्या जंक्शन पासून सुरु होणाऱ्या विद्यमान राज्य महामार्गाला (SH 50) राष्ट्रीय महामार्ग म्हणून जोडणेबाबत सदर प्रस्तावाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली.
महामार्गामुळे बीड ,नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा ,श्रीरामपूर ,संगमनेर ,अकोले या तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील शहापूर जोडले जाणार आहे याबाबत मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवून तातडीने कार्यवाही करणेबाबत निर्देश दिल्याने खासदार वाकचौरे यांनी आभार मानले





