satara | साताऱ्यात बालरंगभूमी परिषदेच्या शाखेला मंजुरी

सातारा, (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेची घटक शाखा असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या सातारा शाखेच्या मंजुरीचे पत्र सातारकर रंगकर्मींकडे सुपूर्त केले. तसेच बालरंगभूमी परिषद सातारा शाखेला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
नाट्य परिषदेने १०० व्या नाट्यसंमेलनाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या नाट्यजागर स्पर्धेत सातारकर रंगकर्मी तसेच बाळगोपाळ अर्थात सातारचे बालरंगकर्मी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता.
त्यामुळे साताऱ्यात बालरंगभूमी परिषदेची शाखा हवी असा आग्रह बालरंगभूमी मुख्य शाखेचे कार्यवाह सतीश लोटके यांनी धरला होता. आनंद कदम व बाळकृष्ण शिंदे या जोडीने प्रामुख्याने सातारच्या नाट्य जागरच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. बालरंगभूमी विकसित झाली तर प्रौढ रंगभूमी बळकट होईल आणि त्यासाठी बालरंगभूमी परिषदेची शाखा साताऱ्यात सुरू करणे आवश्यक होते.
बाळकृष्ण शिंदे, निलेश माने, मिलिंद सुर्वे, रसिका केसकर, चैतन्य पाटेकर, नील केळकर, कुमार मोने, स्नेहा धडवई, आनंद कदम या सगळ्या रंगकर्मींनी फक्त दोनच दिवसात 50 सभासद गोळा केले आणि अर्थातच यासाठी सभासद झालेल्या रंगकर्मींनी, पुढाकार घेतलेल्या मंडळींवर दाखवलेला विश्वास ही तेवढाच महत्वाचा होता. लवकरच सातारा शाखा कार्यकारणी ठरविण्यात येईल आणि एखादा उपयुक्त उपक्रमही राबवला जाईल हा विश्वास सातारकर रंगकर्मींनी प्रशांत दामले यांच्याकडे व्यक्त केला.
नीलम शिर्के-सावंत, राजीव तुलालवर, दीपा क्षीरसागर, सतीश लोटके, दीपक रेगे, दीपाली शेळके, आसिफ शेख तसेच तुषार भद्रे, प्रमोद कोपर्डे, रवींद्र डांगे, नितीन दीक्षित, सचिन मोटे, विजय निकम, राजेश मोरे, राजीव मुळ्ये, संदीप जंगम, प्रसाद नारकर, धैर्यशील उत्तेकर, अमित देशमुख, नितीन देशमाने, रवी इनामदार, सुजित जाधव, सुजित शेख, जितेंद्र खाडिलकर या मान्यवर रंगकर्मींनी सातारा शाखेला शुभेच्छा दिल्या.





