Medical Colleges : राज्यात ६ सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजला मंजुरी
Updated On:

Medical Colleges – महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्राने सहा सुपरस्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत.
महाराष्ट्रात गोंदिया आणि नंदुरबार येथे केंद्र-राज्य खर्च सामायिकीकरण तत्त्वावर दोन वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. ती रुग्णालयांशी संलग्न केली जातील. ११ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६९२ पदव्युत्तर जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
यासाठी ३४५.७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील १४ महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी ८३९.८६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.





