शिरूर पुरवठा निरीक्षक पदी दिपक केदार यांची नियुक्ती

शिरूर : दिपक केदार यांची पुरवठा विभागात सरळ सेवा भरतीमधून आय.बी.पी.एस. परीक्षाद्वारे पुरवठा निरीक्षकपदी त्यांची थेट निवड झाली आहे. त्यांनी नुकताच शिरूर पुरवठा विभागाचा निरीक्षक म्हणुण चार्ज हाती घेतला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ही परीक्षा झाली होती. त्याचा निकाल १८ जून २०२४ रोजी लागला असून त्यात केदार यांची मिरीट प्रमाणे पुरवठा निरीक्षकपदी निवड झाली आहे.
यापुर्वी सतिश पंचरास हे पुरवठा विभागाचे काम पाहत होते. त्यांची शिरुर संजय गांधी योजना अव्वल कारकून पदी नियुक्ती झाली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे पुरवठा विभागात ऑनलाईन रेशनकार्ड काढण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात शासन आपल्या दारी या कॅम्पमध्ये मांडवगण फराटा, वडगाव रासाई येथे शेकडो अर्ज ऑनलाईन रेशनकार्ड काढण्यासाठी आले आहे.
त्यामुळे पुरवठा विभागाची पुरती दमछाक होत आहे. नागरीकांची प्रलंबित असलेली कामे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मार्गी लावल्याचा प्रयत्न केला जाईल असे दिपक केदार यांनी सांगितले.





