Maharashtra Assembly Election 2024 : भाजप विधीमंडळ नेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती

Maharashtra Assembly Election 2024 – भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रातील विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपने दोन केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविले जाणार आहे.
भाजप लवकरच राज्यातील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा अद्याप झालेली नाही.
निर्मला सीतारामन यापूर्वी देखील महाराष्ट्र मध्ये पर्यवेक्षक म्हणून गेल्या आहेत. यामुळे लवकरच महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल.
शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू :
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा असणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानात हा सोहळा रंगणार आहे. तसेच शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयारीची पाहणी केली.
येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा महा शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदानावर सुरु असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदेसेनेचा एकही आमदार त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे शिंदेसेनेच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा झाली.





