पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबई – पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती. पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Politics : वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार होता; आदित्य ठाकरेंकडून पुन्हा दावा
यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. याबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत 75 हजार पदांच्या भरतीसंदर्भांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर इथून पुढे जी मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीत या 75 हजार पदांच्या भरतीसाठी कोणत्या विभागाने काय कारवाई केली त्याचा आढावा प्रत्येकालाच द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याच सोबत दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात 3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे अधिकृत घोषणा करतील. 1993 ते 2003 या कालावधीत ज्यांचे (एसटी) प्रमाणपत्र रद्द झाले म्हणून 2019 साली ज्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात आले होते. या सर्वांना अधिसंख्य पदावरच पुढे ठेवण्यात आले आहे. त्याच सोबत त्यांना निवृत्ती वेतनासह अन्य ज्या सवलती आहेत त्या सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.





