Apple India News : अॅपल भारतात उत्पादन वाढविणार
Updated On:

नवी दिल्ली :- सरकारने उत्पादन आधारित अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अॅपल कंपनी आयफोनचे उत्पादन भारतात वाढविणार असून 2025 पर्यंत एकूण उत्पादनापैकी 18% उत्पादन भारतात घेण्याचा संकल्प कंपनीने केला आहे.
यामुळे भारतातील ग्राहकांची मागणी पूर्ण होईल. त्याचबरोबर निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. अॅपल कंपनीने अगोदरच भारतात दोन रिटेल स्टोअर सुरू केली असून याला भारतीय ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
आणखी तीन स्टोअर सुरू करण्यात येणार आहेत. आपण भारताबाबत कमालीचे आशावादी असल्याचे अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी सांगितले आहे.
टॅग्स:





