“शेतकऱ्यांची माफी माग अन्यथा…’ काँग्रेस नेत्याने भरला कंगनाला सज्जड दम

नवी दिल्ली – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून 26 नोव्हेंबर रोजी या आंदोलनाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून हे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर तळ ठोकून आहेत. अशातच बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत हिने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संबोधले होते. त्यामुळे सध्या कंगनावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे.
दरम्यान, कंगनाच्या या बेताल वक्त्यामुळे चांगलाच वाद पेटला असून मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव मनोज आर्य आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेकराम यादव यांनी कंगनाला सज्जड भरला आहे. “कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संपूर्ण देशामधील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे कंगनाने तू मागितली पाहिजे नाहीतर तुझ्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण होऊ देणार नाही’. असं ते म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.





