IPL Mega Auction 2025 : मेगा लिलावात हे ‘तीन’ अनकॅप्ड खेळाडू बनले करोडपती, यापैकी एकासाठी CSK ने मोजले 3.40 कोटी…

Expensive Uncapped Players IPL Auction 2025 : आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी, अनकॅप्ड खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्ससह अनेक संघांनी अनकॅप्ड खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. दरम्यान, मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी काही अनकॅप्ड खेळाडूही करोडपती झालेले पहायला मिळालं.
1. अंशुल कंबोज – 3.40 कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
अंशुल कंबोज देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळतो. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात त्याने केरळविरुद्ध एकाच डावात सर्व 10 बळी घेत खळबळ उडवून दिली होती. तो आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता, जिथे त्याने 2 सामन्यात 3 विकेट घेतल्या होत्या. त्याला चेन्नई सुपर किंग्जने यंदा मेगा लिलावात 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
2. गुरनून ब्रार – 1.30 कोटी (गुजरात टायटन्स)
गुरनून ब्रार हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. गुरनून हा साडेसहा फूट उंच खेळाडू असून ताशी 145-150 किमी वेगाने गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. तो 2023 मध्ये पंजाब किंग्ज संघाचा एक भाग होता, परंतु आतापर्यंत तो आयपीएलमधील पहिला सामना खेळू शकला नाही. आता आयपीएल मेगा लिलावात त्याला गुजरात टायटन्सने 1.30 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
IPL Mega Auction 2025 : आरसीबीने स्वस्तात खरेदी केला स्फोटक फिनिशर, SRHनं थोडक्यात गमावली संधी….
3. अर्शद खान – 1.30 कोटी (गुजरात टायटन्स)
अर्शद खान हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. अर्शद 2022-2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता, तर 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने त्याचा त्यांच्या संघात समावेश केला होता. अर्शदने आपल्या छोट्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 10 सामने खेळले असून 101 धावा करण्यासोबतच त्याने 6 विकेट्सही घेतल्या आहेत. अर्शदने गेल्या मोसमात 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. यंदा गुजरात टायटन्सने त्याला 1.30 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.





