इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ला आजच्या काळात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखलं जातं. दमदार स्टोरीलाइन, स्टारकास्ट, जबरदस्त गाणी आणि पॉवरफुल एक्टिंग यामुळे हा सिनेमा फॅन्सच्या फेव्हरेट लिस्टमध्ये फिट बसला आहे. दीपिका पादुकोणने तारा या कॅरेक्टरला एक वेगळीच ओळख दिली, तिच्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे तारा हे पात्र दीपिकाशिवाय कुणीच निभावू शकणार नाही असं वाटतं. मात्र तुम्हाला माहितेय का? हा रोल आधी अनुष्का शर्माला ऑफर करण्यात आला होता. अनुष्का शर्मा तिच्या वेगळ्या फिल्म चॉइसेससाठी ओळखली जाते. ती एक टॅलेंटेड प्रोड्यूसर आहे आणि एक दमदार अभिनेत्री देखील आहे. पण, ‘तमाशा’मध्ये तिने काम करण्यास नकार दिला. एका मुलाखतीत अनुष्काला, इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ला नाकार दिल्याबद्दल काही खेद वाटतो का? असं विचारण्यात आलेलं. त्यावर बोलताना तिने, सिनेमाचा फोकस रणबीर कपूरच्या कॅरेक्टरवर जास्त असल्यामुळे हा रोल नाकारल्याचे सांगितले. अनुष्काने असंही सांगितलं की, तिला खात्री आहे की तिने हा सिनेमा केला असता तर तिच्या कामाचं कौतुक झालं असतं. “इम्तियाज अलीच्या सिनेमात कुठलाही एक्टर नेहमीच चांगलाच दिसतो कारण ते एक उत्कृष्ट डायरेक्टर आहेत,” असं अनुष्काने म्हटलं. रणबीर आणि दीपिका याआधी ‘बचना ऐ हसीनों’ आणि ‘ये जवानी है दीवानी’मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं, पण ‘तमाशा’मधून त्यांच्या जोडीला वेगळ्याच प्रकारचं प्रेम मिळालं. आज ‘तमाशा’ हा सिनेमा फक्त एक फिल्म नाही तर अनेक सिनेप्रेमींसाठी एक भावना बनलाय, आणि दीपिका-रणबीरच्या अभिनयाची दखल घेणारा कल्ट क्लासिक ठरलाय.