Anurag Thakur Vs Rahul Gandhi: ‘अनुराग ठाकुर यांनी मला शिवी दिली…’; राहुल गांधींचा गंभीर आरोप; सभागृहात नेमकं काय घडलं, पाहा Video

Anurag Thakur Vs Rahul Gandhi – भारतीय जनता पार्टीचे नेते अनुराग ठाकुर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज सभागृहात जोरदार वाद झाला. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते आणि कन्नोजचे खासदार अखिलेश यादव यांनीही राहुल यांच्या बाजूने वादात उडी घेतली.
देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधी यांनी पुढे रेटली असताना ठाकुर यांनी राहुल गांधी यांच्या जातीबद्दल प्रश्न उपस्थित केल्याने गदारोळ माजला. ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातगणनेची मागणी करत आहेत असे ठाकुर म्हणाले.
त्यांच्या या विधानावरून गोंधळ सुरू झाल्यावर आपण कोणाचे नाव घेतले नसल्याचे ठाकुर म्हणाले. मात्र अनुराग ठाकुर यांनी आपल्याला शिवी दिली असल्याचे राहुल यांनी सांगितले.
तसेच माझा जेवढा अपमान करायचा तेवढा करा, मात्र जातगणना होईलच असेही ते म्हणाले तर तुम्ही जात कशी विचारू शकतात असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
सभापतींना उद्देशून अखिलेश म्हणाले की ते (ठाकुर) मंत्री राहीले आहेत. मोठे नेते आहेत आणि मोठी गोष्ट करत होते. दुर्योधन आणि शकुनी यांनाही ते घेऊन आले. मात्र तुम्ही जात कशी काय विचारू शकता?
दरम्यान, या विषयावर आपल्याला अनुराग ठाकुर यांच्याकडून माफी नको आहे असे राहुल म्हणाले. महाभारतात ज्याप्रमाणे अर्जुनला माश्याचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे मला माझे लक्ष्य दिसते आहे. आम्ही जातनिहाय गणना करूनच दाखवू. असं ते म्हणाले.





