Anurag Kashyap : ब्राह्मण वादावर अनुराग कश्यपची आणखी एक नवीन पोस्ट चर्चेत, थेट म्हणाला…..

Anurag Kashyap – चित्रपट निर्माता-दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ यांनी अलीकडेच एका जाती समुदायावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीवरून बराच वादंग निर्माण झाला असून अनुराग कश्यपवर टीका होत आहे.
अनुराग कश्यपलाही आता त्याची चूक कळली आहे, त्यानंतर त्याने माफी मागितली आहे. अनुराग कश्यपने आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, रागात मी माझ्या मर्यादा विसरलो. असं तो म्हणाला आहे.
अनुराग कश्यपने आज इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, ‘रागाच्या भरात एखाद्याला उत्तर देताना मी माझ्या मर्यादा विसरलो. मी संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल वाईट बोललो.
View this post on Instagram
ब्राह्मण समाजातील अनेक लोक माझ्या आयुष्याचा एक भाग राहिले आहेत. ते लोक अजूनही आपले खूप योगदान विविध प्रकारे देत आहेत. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे.
मी ज्यांचा आदर करतो अशा अनेक बुद्धिजीवी माझ्या रागामुळे आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे दुखावल्या जातात. असे आक्षेपार्ह बोलून मी स्वतःच माझ्या विषयापासून दूर गेलो. मी या समाजाची मनापासून माफी मागतो.
पण एखाद्याच्या हलक्या कमेंटला उत्तर देताना रागाच्या भरात मी नको ते लिहिले. मी त्यावर काम करेन जेणेकरून ते पुन्हा घडू नये. मी माझ्या रागावर काम करेन. जर मला या विषयावर बोलायचे झाले तर मी योग्य शब्द वापरेन. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल’.
अनुराग कश्यपच्या या पोस्टवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या माफी मागण्याच्या निर्णयाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, आत्मनिरीक्षण. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, अशी माफी मागणे ही तुमची महानता आहे.
एका वापरकर्त्याने लिहिले की, चूक मान्य करणे आणि ती सर्वांनी स्वीकारणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तथापि, काही वापरकर्ते अनुरागला अजूनही ट्रोलही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक निराशा व्यक्त करणे टाळा. सर्वांना एकाच तराजूत तोलू नका.





