Sachin Waze : तब्बल साडे पाच वर्षांनंतर सचिन वाझेला जामीन मंजूर; सुटकेचा मार्ग मात्र धूसर
Sachin Waze : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sachin Waze : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकाप्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाकडून वाझेला जामीन मंजूर झाल्याने याप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझे तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, इतर प्रकरणातही सचिन वाझे आरोपी असल्याने तो तुरुंगातून अद्याप तरी बाहेर येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. (Sachin Waze)
अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे आरोपी असून, दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा कोर्टातील सुनावणीत जामीन मिळवण्यासाठी न्यायालयासमोर महत्त्वाचा ठरला. मात्र, अन्य प्रकरणात वाझे आरोपी असल्याने अद्यापही तुरुंगातच राहण्याची अधिक शक्यता आहे. (Sachin Waze)
दरम्यान, 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एक संशयित बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. (Sachin Waze)
स्फोटकांनी भरलेली गाडी आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 10 आरोपींविरोधात अखेर 5 वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यानंतर, आता सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला. (Sachin Waze)
Sachin Waze Case : NIA पुरावे नष्ट करण्याचे काम करतंय – कॉंग्रेसचा आरोप





