विनोद कांबळींचा आणखी एक व्हिडीओ समोर; स्वत: दिली प्रकृतीविषयी माहिती

Vinod Kambli Video| भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यात त्यांची तब्येत ठीक नसून त्यांना उभे राहता येत नसल्याचे पाहायला मिळाले. त्यांची ही अवस्था पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात विनोद कांबळी यांनीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
विनोद कांबळीचा हा व्हिडिओ पाहून रिकी आणि मार्कस कौटो हे त्याचे शालेय मित्र कांबळीला भेटण्यासाठी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले. मार्कस कौटो यांनी विनोद कांबळीच्या घरी जाऊन त्याच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. रामेश्वर सिंह यांनी या भेटीचा एक व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. Vinod Kambli Video|
यावेळी विनोद कांबळी म्हणाले की, “मी ठीक आहे. देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. मी सुखरूप आणि अगदी ठणठणीत आहे. मी एकदम फिट असून तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरू शकतो. फिरकीपटूंच्या चेंडूना आजही मी मैदानाबाहेर टोलवू शकतो. जसं आपण शिवाजी पार्कमध्ये करत होतो,” या सर्वात ते शिवाजी पार्कचा उल्लेख करण्यास विसरले नाही. Vinod Kambli Video|
After facing some health issues, former Indian cricketer, #Vinodkambli is fit and fine, and doing well. His school mate, Ricky Couto and First Class Umpire, Marcus Couto spent 5 hrs with him yesterday during which he was in good spirits and spoke to several other friends as well. pic.twitter.com/e79LpBKRoc
— Rameshwar Singh (@RSingh6969a) August 9, 2024
विनोद कांबळीचे वय 52 वर्ष असून त्यांची ही स्थिती पाहून क्रिकेट चाहत्यांनाही दु:ख झाले आहे. विनोद कांबळी ह्रदयविकारासह डिप्रेशनचा देखील सामना करावा लागला. विनोद कांबळी यांना 2013 मध्ये ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यानं रुग्णालयात नेऊन विनोद कांबळी यांचा जीव वाचवला होता. Vinod Kambli Video|
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी लहानपणीचे मित्र
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी लहानपणी मित्र होते. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांना रमाकांत आचरेकर यांनी मार्गदर्शन केलं होतं. सचिन तेंडुलकरनं 1989ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर विनोद कांबळीनं 1991 मध्ये पदार्पण केले होते.
हेही वाचा :





