कमल हासनच्या ‘इंडियन 2’ चित्रपटाची आणखी एक अपडेट समोर

Kamal Haasan Indian 2 Film| अभिनेता कमल हासनने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका सकरल्या आहेत. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इंडियन 2’ बाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत.
यापूर्वी इंडियन 2 चित्रपटाची रिलीज डेट समोर आली होती आणि आता या चित्रपटाचे संगीत कधी रिलीज होणार याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे कमल हासनच्या या चित्रपटाची प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
इंडियन 2 हा चित्रपट 12 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले असून त्याचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. लायका प्रोडक्शनच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोबतच याला कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रॉकस्टार अनिरुद्धचे वनक्कम इंडिया, इंडियन 2 मधील पहिले संगीत 22 मे रोजी लाँच होणार आहे. सेनापतींच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.”
View this post on Instagram
चाहते कमल हसनच्या इंडियन 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता या चित्रपटाची रिलीज डेट 12 जुलै निश्चित करण्यात आली आहे. हा चित्रपट इंडियन 2 पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बनवण्यात आला आहे. यात कमल हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Kamal Haasan Indian 2 Film|
दरम्यान, कमल हसनचा या वर्षी आणखी एक ‘2898 एडी’ चित्रपट 27 जून रोजी रिलीज होणार आहे. यात कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कमल हासनसह प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन सारखे सुपरस्टार देखील दिसणार आहेत. Kamal Haasan Indian 2 Film|
हेही वाचा:
राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान; कोणत्या लोकसभा मतदार संघात किती मतदान?





