बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडची एन्ट्री; चित्रपटाची रिलीज डेटही केली जाहीर

Binny and Family | ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. यानंतर आता आणखी एक स्टार किड बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होणार आहे. अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनी धवन ‘बिन्नी अँड फॅमिली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
बालाजी मोशन पिक्चर्सच्या इंस्टाग्राम हँडलवर 29 जुलै रोजी ‘बिन्नी अँड फॅमिली’चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये जुन्या आणि आजच्या पिढीची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
चित्रपटाचे पोस्ट शेअर करत, ‘जुन्या काळातील संस्कार विरुद्ध आजचे आधुनिक विचार. बिन्नीचे कुटुंब गुंतागुंतीने भरलेले आहे, परंतु ही आपल्या सर्वांची कहाणी आहे. भेटा ‘बिन्नी अँड फॅमिली’ ला 30 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात,’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Binny and Family |
View this post on Instagram
अंजिनी धवन व्यतिरिक्त या चित्रपटात दिग्गज अभिनेते पंकज कपूर, हिमानी शिवपुरी, राजेश कुमार, चारू शंकर आणि इतर कलाकार आहेत. अंजिनी धवन ही सिद्धार्थ धवनची मुलगी आहे. अंजिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.
इंस्टाग्रामवर तिचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 2020 मध्ये वरुण धवन आणि सारा अली खान यांचा ‘कुली नं. 1’ चित्रपट आला होता. हा चित्रपट वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अंजिनी असिस्टंट डायरेक्टर होती. Binny and Family |
हेही वाचा:
केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती





