मुंबईत पुन्हा गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात आरोपींकडून भर रस्त्यात बिल्डरवर हल्ला

Mumbai News | मुंबईतील चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाच्या सिग्नलजवळ एका बिल्डवर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे. दोघे बाईकस्वारांनी बांधकाम व्यावसायिकावर रात्री 9.50 वाजता दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 50 वर्षीय सद्रुद्दीन खान हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बांधकाम व्यावसायिक सद्रुद्दीन हे बेलापूरमध्ये राहणारा असून तो सायन-पनवेल हायवेवरून पनवेलच्या दिशेने जात असताना अचानक दोन बाईकस्वार आले आणि त्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डिफेंडर गाडीवर गोळीबार केला.
मात्र हा गोळीबार का आणि कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
धावत्या गाडीवर गोळीबार
दरम्यान, सद्रुद्दीन खान हे बेलापूरच्या पारसिक हिल येथे राहतात. ते सायन-पनवेल हायवेने पनवेल जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या धावत्या गाडीवर गोळीबार केला. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण मुंबईतील अत्यंत गजबजलेलं आहे.
त्या ठिकाणी भर रस्त्यात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या सद्रुद्दीन खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. बिल्डर सद्रुद्दीन खान याच्यासोबत गाडीमध्ये त्याचा ड्रायव्हर होता. आता पोलिस त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहेत. Mumbai News |
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित
दरम्यान, गेल्या काही दिवासंपासून व्हीआयपी व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्याचा घटनांमुळे मुंबई वारंवार चर्चेत येत आहे. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार या घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे, यातच आता बिल्डवर भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. Mumbai News |
हेही वाचा:





