भाजप सरकारकडून आणखी एक नामांतर ! राजीव गांधी नॅशनल पार्कचेही नाव बदलणार
Updated On:

नवी दिल्ली – आसामात राजीव गांधी नॅशनल पार्कचेही नाव बदलण्याचा घाट तेथील भाजप सरकारने घातला आहे, हा केवळ एक राजकीय सूड बुद्धीचा प्रताप आहे अशी टीका कॉंग्रेसचे खासदार रिपुन बोरा यांनी केली आहे.
आसाम सरकारने हा निर्णय मागे घेऊन राजीव गांधी यांचे नाव कायम ठेवावे अशी मागणीही त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. आसामातील जनतेचे राजीव गांधी यांच्याशी भावनिक नाते आहे, 1985 साली राजीव गांधी यांनी आसाम करार करून आसामातील मोठा प्रश्न रक्ताचा एक थेंबही न सांडता सोडवला होता, अशा थोर नेत्याची राज्यातील स्मृति पुसली जाऊ नये अशी मागणीही बोरा यांनी केली आहे.
1 सप्टेंबर रोजी झालेल्या आसाम सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत या नॅशनल पार्कचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला आता ओरंग नॅशनल पार्क असे नाव दिले जाणार आहे.





