कार्तिक आर्यनबाबत आणखी एका सिनेमाची अफवा

कार्तिक आर्यन एका गॅंगस्टर मुव्हीमधून बाहेर पडला आहे, अशी बातमी ऐकायला मिळाली आहे. यापूर्वी “दोस्ताना-2′ आणि रेड चिलीज एन्टरटेनमेंटच्या एका सिनेमातून कार्तिक आर्यनला बाहेर काढले गेले असल्याची बातमी पसरली आहेच.
आता एका गॅंगस्टर मुव्हीमधूनही त्याला बाहेर काढले गेले असल्याचे समजते आहे. आनंद एल राय हा सिनेमा करणार होते. मात्र आपल्या सिनेमाबाबत ही अफवा पसरली असल्याचे स्पष्टिकरण आनंद एल राय यांनी दिले आहे. आम्ही वेगळ्याच सिनेमासाठी कार्तिकला भेटलो होतो. त्यासंदर्भातील चर्चा अद्यापही सुरूच आहे.
गंगस्टर मुव्ही असलेल्या एका पूर्ण वेगळ्या सिनेमाबाबत आयुष्मान खुरानाशी चर्चा सुरू आहे. पण त्याचा आणि कार्तिक आर्यनबरोबरच्या सिनेमाचा काहीही संबंध नाही. काही महिन्यांपूर्वी कार्तिक आर्यनला चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या ऑफिसच्या बाहेर पाहिले गेले होते.
त्यामुळे त्याच्या सहभागाबद्दलची चर्चा सुरू झाली होती. करण जोहर आणि शाहरुख खान यांच्या सिनेमातून छुट्टी झाल्यावर कार्तिकला आणखी एका सिनेमातून बाहेर काढले गेल्याची चर्चा अशी सुरू झाली होती.





