Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत संजय राऊतांचा खळबळजनक दावा म्हणाले…
Sanjay Raut : अशातच आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अॅापरेशन टायगर यशस्वी करून उद्धव ठाकरेंना धक्का दिला. साथ सोडून गेलेल्या बंडखोर ६ खासदारांच्या मतदारसंघात जात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अशातच आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात त्यांच्या पदावर राहतील की नाही अशा प्रकारचे रहस्यमय वातावरण मिध्यांनी निर्माण केले आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राऊतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर देखील पुन्हा एकदा जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“ओम निंबाळकर सोंगाड्या आहे. मला देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं की, विरोधी पक्षात असताना त्यांना तुम्ही भेटी देत नाहीत. त्यांनी आणलेल्या विकासकामांच्या कागदांवर तुम्ही चर्चा करत नाहीत. पण एखाद्याने पक्षांतर केले की तुम्ही त्यांना समोर बसवतात. त्याचे कागद मंजूर करतात, देवेंद्र फडणवीस हा घटनेशी द्रोह आहे. म्हणूनच त्याची कर्माची फळ तुम्हाला मिळतायेत.” अशी टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.
संजय राऊतांचा खळबळजनक दावा
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरु झालंय. काही काळापासून देवेंद्र दिल्लीत जाणार, उच्च पदावर जाणार या चर्चांना त्यांच्या वागणुकीमुळेच आता पूर्णविराम मिळाला आहे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात त्यांच्या पदावर राहतील की नाही अशा प्रकारचे रहस्यमय वातावरण मिध्यांनी निर्माण केले आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,” असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला.
केंद्रात दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा रंगली आहे. यापैकी एक मंत्रीपद ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या बंडोखोर सहा खासदारांपैकी एकाला मिळू शकते. दोन मंत्रीपदासाठी अनेकांची नावं चर्चेत असून कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.






