छळाला कंटाळून आणखी एक जीव गेला? IG सुपेकर यांच्यावर दमानियानियांचा सनसनाटी आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता वेगळ्या वळणावर आले आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) रुपाली ठोंबरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कारागृह निरीक्षक डॅा. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आरोपींना संरक्षण दिल्याचा आणि पीडित कुटुंबाला धमकवल्याचे दामियांना यांनी म्हटले आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली असून त्यांनी केलेल्या आरोपांचे सुपेकर यांनी खंडन केले आहे़.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून सून आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले. दोन्ही सूनांना गप्प बसण्याची धमकी देण्यात आली, असा सनसनाटी आरोप केला आहे.
रुपाली पाटील-ठोंबरेंनी दर्शविला पाठिंबा
याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली पाटील -ठोंबरे यांनी दमानिया यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा दर्शविला आहे. शशांक हगवणे यांचे मामा असलेल्या सुपेकरांनी पीडितांना त्रास दिला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरून संपाप व्यक्त करण्यात येत असून #JusticeForVaishnavi हा हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे.
सुपेकर यांची बाजू काय?
दमानिया आणि ठोंबरे यांनी केलेल्या आरोपांवर डॅा सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. हगवणे कुटुंब माझे दूरचे नातेवाईक आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून माझा त्यांच्याशी संपर्क नाही. मी स्वतः दोन मुलींचा पिता आहे आणि असा जघन्य कृत्याला कोणताही पिता पाठिंबा देऊ शकत नाही. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.
वैष्णवी च्या नवऱ्याचे मामा IG जालिंदर सुपेकर हे सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे.
ही अशोक सादरे ह्यांची सुसाइड नोट. ह्या PSI अशोक सदरेंना जालिंदर सुपेकरांनी दोन महिन्याच्या पैशाच्या कलेक्शन दिले नाही म्हणून व दिवाळीचे सोन दिले नाही म्हणून अतोनात मानसिक छळ केला आणि… pic.twitter.com/0E9dr5UWcu
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 23, 2025
दमानियांचा गंभीर आरोप
सामिजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पीएसआय अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातही मोठा दावा केला आहे. सुपेकर यांनी सादरे यांना दोन महिन्यांचे पैसे आणि दिवाळीचे सोने न दिल्याने त्यांचा मानसिक छळ केला, ज्यामुळे सादरे यांनी आत्महत्या केली, असे सुसाईड नोटचा हवाला देत त्यांनी दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकारी शिरखर परदेशी यांच्याकडे 500 कोटींच्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.





