मुंबईत बेस्ट बसने आणखी एकाला चिरडले; सीएसटीजवळ एक जण ठार
Updated On:

मुंबई – मुंबईच्या कुर्ला भागात बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा असाच अपघात झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये बेस्ट बसने एकाला पादचाऱ्याला उडवले आहे.
या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुंबईच्या कुर्ला भागात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता.
भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली, यात अनेक जण बस खाली चिरडले गेले. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 33 जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली.





