बॉलीवूडमधील आणखी एका अभिनेत्रीला कर्करोगाचे निदान; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Tannishtha Chatterjee | बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना केला आहे. यातील काहींनी या आजारावर मात केली आहे. तर काही कलाकार आजही कर्करोगाशी झुंज देत आहेत.
यातच आता आणखी एका अभिनेत्रीला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘गुलाब गँग’ चित्रपटातील अभिनेत्री तनिष्ठा चटर्जीला स्टेज 4 ऑलिगोमेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे.
View this post on Instagram
तनिष्ठाची पोस्ट
कर्करोगाचे निदान तनिष्ठाला 8 महिन्यांपूर्वी झाले. यानंतर आता तिने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहे. एका फोटोत तिच्या बहिणी, मैत्रिणी दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तनिष्ठा चटर्जी सोफ्यावर बसलेली दिसत आहे. सोबतचे तिने पोस्टमध्ये लिहिले की, “गेली 8 महिने खूप कठीण गेले. माझे वडील कर्करोगामुळे मी गमावले. आता 8 महिन्यांपूर्वी मला स्टेज 4 ऑलिगोमेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले. Tannishtha Chatterjee |
ही खास पोस्ट वेदना आणि दुःख सांगायला नसून प्रेम व्यक्त करायची आहे. यापेक्षा वाईट असू शकत नाही की, 70 वर्षांची आई आणि 9 वर्षांची मुलगी दोघीही पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत. पण सर्वात वाईट क्षणांमध्ये, मला एक असाधारण प्रकारचे प्रेम सापडले. जे तुम्हाला कधीही एकटे वाटू देत नाही. Tannishtha Chatterjee |
मला ते माझ्या मित्रांमध्ये आणि कुटुंबात सापडले. ज्यांच्या पाठिंब्यामुळे कठीण दिवसांतही माझ्या चेहऱ्यावर खरे हास्य आणले. एआय आणि रोबोट्सकडे धावणाऱ्या जगात खऱ्या, उत्साही माणसांचे प्रेम मला वाचवत आहे. त्यांची सहानुभूती, त्यांचे मेसेज, त्यांची उपस्थिती मला जगण्यास मदत करत आहे. माझ्यावरचे प्रेम, सहानुभूती आणि मला कठीण काळात शक्ती दिल्यामुळे तुमची खूप आभारी आहे.” असे तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे.
तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय चाहते ती या आजारातून लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा :
लाडक्या बहीणींना ‘हे’ काम करावेच लागणार; अन्यथा खात्यात १५०० रुपये जमा होणार नाही





