गुजरात निवडणुकपूर्वी काॅंग्रेसला आणखी एक झटका
Updated On:

गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला झटके बसण्यास सुरूवात झाली असून दोन दिवसांत पक्षाच्या तिसऱ्या आमदाराने पक्षाला रामराम केला आहे.
झालोडचे आमदार भावेश कटाराने कॉंग्रसेचा राजीनामा दिला असून ते भारतीय जनता पार्टीत दाखल होणार असल्याचे मानले जाते आहे. या अगोदर मोहनसिंह राठवा आणि भगवान बराड यांनी कॉंग्रेसचा हात सोडला आहे.





