‘तारक मेहता…’ मधील पुन्हा एका अभिनेत्रीचे गंभीर आरोप म्हणाली, “निर्माता कुत्र्यासारखं वागवत असे; नट्टू काकांना शिवीगाळही …”

मुंबई – ‘मिसेस सोधी’ म्हणजेच जेनिफर मिस्त्री बन्सीवालनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदींवर आरोप लावले आहे. अभिनेत्री मोनिका भदोरियाने शोच्या सेटवर तिला कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या हे सांगितले आहे.
View this post on Instagram
मोनिका भदोरियाने वृत्तमध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘तारक मेहता’च्या सेटवरील कामाचे वातावरण नरकासारखे होते. इतकंच नाही तर सेटवर कलाकारांना कुत्र्यांसारखं वागवलं जातं, असंही मोनिका भदोरियाने सांगितले आहे.
मोनिका भदोरिया ‘तारक मेहता’मध्ये बावरीची भूमिका साकारत होती. पण तिने 2019 मध्ये शोचा निरोप घेतला. मोनिका भदोरियाने या नवीन मुलाखतीत दावा केला आहे की, निर्मात्यांनी तीन महिन्यांपासून तिचे पैसे दिलेले नव्हते. मेकर्सकडे तिचे 4 ते 5 लाख रुपये अद्यापही बाकी आहेत.
मोनिका भदोरिया यांनी पत्रकरांशी संवाद साधताना सांगितले की, ‘पैशावरून वर्षभर मी निर्मात्यांशी भांडले. प्रत्येक कलाकाराचे पैसे त्यांनी रोखून धरले आहे. मग तो राज अनडकट असो वा गुरचरण सिंग. केवळ अत्याचारासाठी पैसे रोखले जातात. त्याच्याकडे पैशाची कमतरता नाही.’
ती पुढे सांगते,’तारक मेहता’च्या सेटवर आयुष्य ‘नरका’सारखे होते. माझी आई कॅन्सरवर उपचार घेत होती, पण निर्मात्यांनी मला अजिबात साथ दिली नाही. मी हॉस्पिटलमध्ये रात्र काढायचे आणि तो मला पहाटे शूटिंगसाठी बोलवायचे. मी येण्याच्या स्थितीत नाही, असे सांगूनही ते मला शूटिंगसाठी येण्यास भाग पाडत असे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शूटिंगला आल्यानंतर मला थांबावे लागायचे. माझ्याकडे अजिबात काम नव्हते.
मोनिका भदोरियाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ साइन केला तेव्हा तिला दरमहा 30,000 रुपये मिळत होते. ६ महिन्यांनी पगार वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र कधीही पैसे वाढवले नाही. याबाबत मोनिका भदोरिया म्हणाली, ‘ते पैसे फसवतात. खरोखर ते कुत्र्यासारखे वागतात. त्याने माझ्याशी खूप वाईट वर्तन केले आहे. आणि सोहेल रमानी खूप उद्धट आहे. त्याने नट्टू काकांना शिवीगाळही केली. असं म्हणत तिने सेटवर कलाकारांशी कसे वागतात याबाबत खुलासा केला आहे,





