‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका कलाकाराने घेतला मालिकेचा निरोप

Palak Sindhwani Left TMKOC | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. यातील अनेक जुन्या कलाकारांनी हा शो सोडला. यानंतर आता या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने देखील आता शो सोडला आहे. निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर अभिनेत्रीने हे पाऊल उचलले आहे.
सेटवरील तिचे काही फोटो शेअर करत पलकने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ‘आज मी सेटवरील माझा शेवटचा दिवस संपवत असताना, मी गेल्या पाच वर्षांच्या मेहनत, समर्पण आणि चिकाटीने भरलेल्या गोष्टींचा विचार करत आहे. या प्रवासात तुम्ही मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल माझ्या अद्भुत प्रेक्षकांचे आभार,’ असे पलकने लिहिले आहे.
पुढे तिने लिहिले की, ‘या प्रवासासाठी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद मला मिळाला त्या अविश्वसनीय लोकांची मी मनापासून आभारी आहे. मी खूप काही शिकले आहे. फक्त माझ्या सहकलाकारांकडूनच नाही तर पडद्यामागील प्रत्येकाकडून, माझ्या हेअर स्टायलिस्टपासून स्पॉट टीम, मेकअप टीम आणि इतर सर्वांकडून खूप शिकायला मिळाले.’ Palak Sindhwani Left TMKOC |
‘माझा निरोप अश्रूंनी भरलेला होता आणि आम्ही एक संघ म्हणून तयार केलेल्या अद्भुत आठवणी मी जपत राहीन. मला सामान्य जीवनात परत येण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याने मी हा वेळ चिंतन, विश्रांती आणि रिचार्ज करण्यासाठी घेईन. जेणेकरुन मी मजबूत आणि पुढील वाटचालीसाठी तयार होऊ शकेन.’ Palak Sindhwani Left TMKOC |
दरम्यान, शोच्या निर्मात्यांनी पलक सिंधवानीवर कराराचा भंग केल्याचा आरोप केला होता. निर्मात्यांनी अभिनेत्रीकडून नुकसान भरपाईही मागितली होती. अशा परिस्थितीत निर्माते आणि पलकमधील वाद कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचला. यानंतर पलकने शो सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा:
‘सद्गुरूच्या ईशा फाऊंडेशनवर पोलिसांची कारवाई थांबली’ उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती





