24 तासांत 86 हजार 961 जणांना करोनाची बाधा
Updated On:

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत आणखी 86 हजार 961 जणांना करोनाची बाधा झाल्याने देशातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 54 लाख 88 हजार इतकी झाली आहे.
तथापि त्यातील 43 लाख 96 हजार 399 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी हे अपडेट्स जाहीर केले.
दरम्यान, देशातील करोनाग्रस्तांच्या मृतांची संख्या 87 हजार 882 इतकी झाली आहे. सध्या संपूर्ण देशात करोनाचे 10 लाख 3 हजार 299 बाधित आहेत.
देशभरात कालपर्यंत एकूण 6 कोटी 43 लाख 92 हजार 594 करोना चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांत देशभरात जे 1130 रुग्ण दगावले आहेत त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 101 इतकी आहे.





