पुणे बिजनेस क्लब, सयोग वेंचर्सचा रविवारी वार्षिक सोहळा

पुणे – खास महिला उद्योजकांसाठी कार्यरत असलेले आणि महिला उद्योजकांचा व्यवसाय वाढीसाठीचे एक अग्रगण्य व्यासपीठ असलेले पुणे बिजनेस क्लब व सयोग वेंचर्सचा वार्षिक पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 25) शिवाजीनगर येथील रॉयल बॅक्वेंट हॉलमध्ये रंगणार आहे.
यावेळी ‘द बिजनेस मॅगझिन’ या मासिकाचे अनावरण देखील करण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा ‘पुणेरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आकांक्षा ज्वेलर्सच्या संस्थापिका अनिता क्षीरसागर, पर्ली ब्युटी पार्लरच्या संस्थापिका पुनम भिक्षावतीमठ, फ्लेवर्स स्ट्रीटच्या संस्थापिका अलमास कुची, व्हायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीजच्या संस्थापिका अध्यक्षा अश्विनी सुनील जाधव, गिफ्ट्स अवेन्यूचे संस्थापक अभिजीत बोरा, इनरव्हील क्लब ऑफ पुणे अपटाऊनच्या प्रेसिडेंट सुषमा कोंडे, सॅमव्हिल पावरचे संचालक सचिन चोरडिया उपस्थित राहणार असून, एलोवेरा स्कूलच्या विक्री वितरण व्यवस्थापक सविता पाटील व आर. पी. टी. एस च्या संस्थापिका रश्मी देशमुख पापळकर व्यवसाय वृद्धीसाठीचे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती क्लबच्या संस्थापक अध्यक्षा सपना काकडे यांनी दिली.





