अण्णापूर रामलिंग रस्ता खडीमय

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सविंदणे, दि. 20 (वार्ताहर) -अण्णापूर -रामलिंग या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या रस्त्यावरील खडी उखडली असून, वाहन चालवताना वाहनचालकांचे मोठे हाल होत आहे.

रस्त्यावर खडी असल्यामुळे वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सविंदणे, कवठे येमाई, पिंपरखेड, टाकळी हाजी, जांबूत, मलठण या भागातून तालुक्‍याच्या ठिकाणी शिरूर येथे विविध कामांसाठी यावे लागते.

हा रस्ता पूर्ण खराब झाल्यामुळे नागरिकांचे जाण्या – येण्याचे हाल होत आहे. तसेच आमदाबाद फाटाच्या माशेरेमळा ते अण्णापूर रस्त्यावर काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मयूर सोनवणे यांना वेळोवेळी या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व काटेरी झुडुपे काढण्याबाबत वेळोवेळी सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

  • अण्णापूर -रामलिंग हा रस्त्याचे नव्याने होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे संपूर्ण खडी उखडून रस्त्यावर आली आहे. ठेकेदार वेळेवर काम करत नाही. तसेच काटेरी झुडुपे ही काढली गेली नाही. त्यामुळे वाहनचालकांचे खूप हाल होत असून छोटे-मोठे अपघात होत आहे. वेळोवेळी अभियंता सोनवणे यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत आहे.
    -नीतिन थोरात, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघ महाराष्ट्र राज्य
  • दोनच दिवसांत संबंधित ठेकेदाराला सांगून अर्धवट राहिलेले काम व काटेरी झुडुपे काढण्याचे काम पूर्ण केले जाईल.
    -मयूर सोनवणे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)