बाॅलिवूड अभिनेत्रींनाही लाजवेल असं सौंदर्य: नेपाळमध्ये तृतीयपंथी ठरली सौंदर्य स्पर्धेची विजेती, पहा फोटो

काठमांडू – नेपाळमध्ये झालेल्या मिस पिंक नेपाळ २०२४ या सौंदर्य स्पर्धेमध्ये अनमोल रॉय या तृतीयपंथीने विजेतेपद मिळवले आहे. ही स्पर्धा केवळ तृतीयपंथीयांसाठीच आयोजित केली गेली होती. दिनांक १७ मे रोजी पाळण्यात येणाऱ्या होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बिफोबिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
![Miss Pink 2024: así se vivió el certamen que coronó a Anmol Rai como reina transgénero [FOTOS] | RPP Noticias](https://f.rpp-noticias.io/2024/05/17/402540_1583454.jpg)
लैंगिक अल्पसंख्यांक समुदाय मजबूत आणि शिक्षित बनवण्याच्या उद्देशाने गुरुवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, असे एलजीबीटीआयक्यू समुदायाच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी समर्पित असलेल्या ब्लू डायमंड सोसायटीच्या अध्यक्षा पिंकी गुरुंग यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ स्पर्धकांमध्ये सुंदर वेशभूषा केलेल्या स्पर्धकांपैकी पहिल्या १० स्पर्धकांची पहिल्या फेरीत निवड झाली; दुसऱ्या फेरीदरम्यान पहिल्या पाच जणांची निवड एका प्रश्नाच्या आधारे करण्यात आली. तुम्ही एलजीबीटीक्यू समुदायासाठी सर्वोत्तम प्रचारदूत का आहात असे तुम्हाला का वाटते? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

त्यावर लहानपणापासून तृतीयपंथी असल्याबद्दल हिणवले गेले. मात्र पालकांचा पाठिंबा आपल्याला मिळाल्यामुळे यामुदायासाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे उत्तर अनमोल रॉय हिने दिले. या उत्तराने प्रभावित होऊन परिक्षकांनी तिला मिस पिंक नेपाळ २०२४ ची विजेती घोषित केले.

नेपाळसाठी संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक हाना सिंगर आणि आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाचे सचिव डॉ रोशन पोखरेल यांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेच्या कार्यक्रमात सरोसी न्यौपा प्रथम उपविजेती आणि आरोही बसनेट ही दुसरी उपविजेती घोषित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्याला या वर्षाच्या अखेरीस थायलंडमध्ये होणाऱ्या मिस इंटरनॅशनल क्वीन २०२४ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.





