Ankush Kakade : “दादा तुम्ही आज महत्त्वाचा निर्णय…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची पोस्ट
Ankush Kakade : 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख खुद्द अजित पवार यांनीच चर्चेअंती ठरवली होती.'
Ankush Kakade : अजित पवारांच्या विमान अपघाती निधनानंतर अनेकांकडून शंका उपस्थित केले जात आहे. अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. याचदरम्यान शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अंकुश काकडेंची पोस्ट
अंकुश काकडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यात राष्ट्रवादीच्या गुप्त चर्चेचा संदर्भ दिला आहे. ‘आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज करणार होतात, ‘असे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी, अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्ट केले होते.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता, असा गौप्यस्फोटही पवारांनी केला होता. यानंतर आता आज 12 तारखेलाच अंकुश काकडे यांनी केलेल्या पोस्टने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
हेही वाचा:
New Labor Code : ‘आठवड्यात ४८ तास काम करा आणि सुट्टी घ्या’; विकसित देशातील पॅटर्न राज्यात लागू होणार






