ankita lokhande : सुशांतसोबतच नातं संपलं त्यादिवशी नेमकं काय घडलं…; अंकिता लोखंडेचा धक्कादाय खुलासा

ankita lokhande – ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. यामध्ये पवित्र-रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे देखल सहभागी झाली असून, सध्या या घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे. बिग बॉसच्या घरातही अंकिता सुशांतबद्दल व्यक्त झाली होती. सुशांतने रातोरात नातं संपवलं होतं, असं ती म्हणाली होती.
दरम्यान, अंकिता लोखंडे (ankita lokhande) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) सोबत ब्रेकअप झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षे त्याची प्रतीक्षा केल्याचं अंकिताने स्पष्ट केलं. मात्र अचानक एकेदिवशी तिने या सर्वातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी नेमकं काय घडलं याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “जवळपास अडीच वर्षांपर्यंत मी याच भ्रमात होते की आमच्याच गोष्टी ठीक होतील. आमचं नातं पुन्हा मार्गावर येईल. पण एके दिवशी, 31 जानेवारी रोजी मी त्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं. माझ्या घरात आमच्या दोघांचे खूप सारे फोटो होते. त्यादिवशी मी मनाशी निर्णय पक्का केला आणि आईला ते सर्व फोटो काढून टाकायला सांगितले.
अंकिताने सांगितलं की तिच्या आईने सुशांतसोबतचे सर्व फोटो घरातून काढून टाकले आणि नंतर ते फाडले. त्यादिवशी मी माझ्या रुममध्ये गेले आणि त्यादिवशी खूप रडले. आईने ते सर्व फोटो काढले आणि फाडून टाकले. तो सर्व गोष्टींचा शेवट होता. मी त्याची वाट पाहिली, मी सर्वकाही केलं होतं. त्या घटनेच्या सहा महिन्यांनंतर विकी माझ्या आयुष्यात आला”, असं अंकिताने स्पष्ट केलं.





