अंकिता लोखंडे बेबी प्लॅनिंगबद्दल म्हणाली,’मला घाई…’

अभिनेत्री अंकिता लोखंडेने 2021 मध्ये विकी जैनसोबत लग्न केले. लग्नानंतर अनेक वेळा अंकिताचे काही फोटो पाहिल्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या चर्चेत आल्या. मात्र, प्रत्येक वेळी या सर्व चर्चा चुकीच्या ठरल्या. आता अंकितानेच या चर्चांवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. नकली बेबी बंप दाखवण्यासाठी तिचे फोटो कसे एडिट केले गेले हे देखील अंकिताने सांगितले आणि असे करणाऱ्यांना अंकितानेही उत्तर दिले आहे.
अंकिताने सांगितले की, प्रत्येक सेलिब्रिटीला याचा कसा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर यादरम्यान अंकिताला तिच्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दलही तिने बेधडक आपली भूमिका मांडली आहे
अंकिता म्हणाली, मला वाटत नाही की मी एकमेव अभिनेत्री आहे जिच्यासोबत हे सर्व घडत आहे. तुम्ही अविवाहित असताना लोक विचारतात तुम्ही लग्न कधी करणार आहात? लग्न कधी करणार? आता झाले, मग मूल होत आहे का ? होत नाही, झाले आहे का, तुम्ही प्रेग्नंट आहात का असे विचारतात. अशा गोष्टी लिहिल्या जातात. इतकंच नाही तर घटस्फोटही होऊ शकतो असे प्रश्न चर्चेत असतात, मला वाटतं हे सगळं मीडियात चालतं.’ अंकिताला तिच्या बेबी प्लॅनिंगबद्दल म्हणाली,’मला घाई नाही आणि जे काही घडले ते होईल. हे सर्व नशिबावर अवलंबून असते.’ असं म्हणत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.





