Anjali Damania : मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव; ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’ हाच का न्याय? दमानियांचा सनसनाटी आरोप

मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावरील मानसिक व शारीरिक छळाचे आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगत कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला विरोध दर्शवला. या विवाहित महिलेने हे प्रकरण वैयक्तिक आहे आणि यावर राजकारण करू नये.
“मी संजय शिरसाट यांचा सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप मी मागे घेते. दरम्यान, विवाहित महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ?, हे माझं वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात?…घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
सदर महिलेने दिलेली कायदेशीर नोटीस मागे घेण्यात आली यावरून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट दिसतंय, ब्लेड ने स्वतःला कापून, स्वतःवर बंदूक लावून मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन, त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं, लग्नानंतर गर्भपात करायला लावणे, आणि नंतर माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदांचे उजवे हात आहेत, असे म्हणून तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
तसेच, अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’ न्याय आहे का?, ह्या सामाजिक मंत्री मंत्रीपदाला हे लायक नाहीत. एकनाथ शिंदेंनी ह्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे, असंही अंजली दमानियांनी यांनी यावेळी म्हटलं आहे.
सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ?
हे माझा वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात?
घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 27, 2025
“हे घरगुती प्रकरण, राजकारण नको”
महिलेनं स्पष्ट केलं की, हे प्रकरण वैयक्तिक आहे आणि यावर राजकारण करू नये. “मी संजय शिरसाट यांचा सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप मी मागे घेते. या प्रकरणाला मी फुल स्टॉप देते. माझ्या नावावर कोणी राजकारण केल्यास कायदेशीर कारवाई करेन,” असा इशारा तिने दिला. तिनं पुढे सांगितलं की, संजय शिरसाट यांनी कधीही त्रास दिला नाही किंवा संपर्क साधला नाही. “मला हे प्रकरण संपवून पुढे जायचं आहे,” असं ती म्हणाली.
महिलेने काय केले होते आरोप?
२०१८ मध्ये सोशल मीडियाद्वारे सिद्धांत आणि या महिलेची ओळख झाली. त्यानंतर चेम्बूर येथील फ्लॅटवर त्यांच्या भेटी वाढल्या आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. १४ जानेवारी २०२२ रोजी बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा महिलेने केला होता. मात्र, लग्नानंतर सिद्धांतच्या वर्तनात बदल झाला.
त्यानं जबरदस्तीने गर्भपात करवल्याचा आणि चेम्बूरच्या फ्लॅटमध्ये राहण्यास भाग पाडल्याचा आरोप तिनं केला होता. सिद्धांतचे इतर महिलांशी संबंध आणि पूर्वीचे विवाहसंबंध उघड झाल्यानंतर २० डिसेंबर २०२४ रोजी शाहूनगर पोलिसांत तक्रार दाखल झाली. संजय शिरसाट यांनी राजकीय प्रभाव वापरून प्रकरण दडपल्याचा आरोपही तिनं केला होता.




