Anil Menon : नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय वंशाचे अनिल मेनन यांची निवड
भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन (Anil Menon) यांची अवकाश स्थानकावरील मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठ महिन्यांच्या मोहिमेसाठी ते रवाना होणार आहेत.

Anil Menon : भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन (Anil Menon) यांची अवकाश स्थानकावरील मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठ महिन्यांच्या मोहिमेसाठी ते रवाना होणार आहेत.
मिनियापोलिसमध्ये युक्रेन आणि भारतीय स्थलांतरित पालकांच्या पोटी जन्मलेले मेनन (Anil Menon) हे आपत्कालीन वैद्यकशास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या स्पेस फोर्समधील कर्नल आहेत. अमेरिकी हवाई दलातील आपल्या कार्यकाळात, त्यांनी ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम दरम्यान अफगाणिस्तानमध्ये आघाडीवर सेवा बजावली आणि हिमालयन रेस्क्यू असोसिएशनसाठी माउंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांची काळजी घेण्याचे कामही केले.
मेनन (Anil Menon) यांनी पोलिओ लसीकरण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रोटरी अॅम्बेसेडोरियल स्कॉलर म्हणून भारतात एक वर्ष घालवले आहे. ते अंतराळवीर प्योत्र दुब्रोव्ह आणि ॲना किकिना यांच्यासोबत रोस्कोस्मोस सोयुझ एमएस-२९ या अंतराळयानातून अंतराळात प्रवास करणार आहेत. मेनन यांनी २०१४ मध्ये नासामध्ये फ्लाइट सर्जन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणाऱ्या व काम करणाऱ्या अंतराळवीरांसोबत काम केले.
मेनन २०१८ मध्ये स्पेसएक्समध्ये सामील झाले, तिथे त्यांनी कंपनीचा वैद्यकीय कार्यक्रम सुरू केला, स्पेसएक्सच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणांच्या तयारीस मदत केली आणि चंद्र, मंगळ व त्यापुढील मोहिमा हाती घेण्यासाठी असलेल्या स्टारशिप या अतिजड रॉकेट आणि अंतराळयानाच्या विकासावर बारकाईने काम केले.
मेनन (Anil Menon) यांची डिसेंबर २०२१ मध्ये नासाचे अंतराळवीर म्हणून निवड झाली आणि पुढील महिन्यात ते दोन वर्षांच्या प्रशिक्षणात सामील झाले. मेनन यांच्या पत्नी अॅना विल्हेल्म यादेखील एक अंतराळवीर असून, त्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये स्पेसएक्सद्वारे संचालित पोलारिस डॉन या खाजगी मानवी अंतराळ मोहिमेअंतर्गत जवळपास पाच दिवस अंतराळात प्रवास केला आहे.






