बंगळुरू : टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे हे आपल्याला नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. अनिल कुंबळे यांना कर्नाटक सरकारच्या वनविभागाने ब्रॅण्ड ऍम्बेसडर म्हणून नियुक्त केलं आहे.कर्नाटक सरकारमधील वनमंत्री इश्वर खांडरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. अनिल कुंबळेने मानले आभार ‘कर्नाटक राज्य वन विभाग आणि वन्यजीव संवर्धनासाठीचा ब्रॅण्ड ऍम्बेसडर म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल मी कर्नाटक सरकार आणि वनमंत्री इश्वर खांडरे यांचे आभार मानतो. राज्यातील वनस्पती आणि वन्यजीवांच्या विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वन्यजीव संवर्धन तसंच वन विभागातील कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मी माझं काम सुरू ठेवेन’, असे म्हणत अनिल कुंबळेनी कर्नाटक सरकारचे आभार मानले आहे. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಮತ್ತು ವನ್ಯಜೀವಿ ಸಂರಕ್ಷಣ ರಾಯಭಾರಿಯಾಗಿ ನನ್ನನ್ನು ನೇಮಿಸಿದಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಅರಣ್ಯ ಸಚಿವರಿಗೆ ಶ್ರೀ @eshwar_khandre ನನ್ನ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಸಸ್ಯ ಹಾಗೂ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿನ ವೈವಿಧ್ಯತೆಯ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಲು,ವನ್ಯಜೀವಿ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು… https://t.co/cxdsOJohar — Anil Kumble (@anilkumble1074) May 27, 2025 अनिल कुंबळे यांची कारकीर्द अनिल कुंबळे यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते भारताच्या टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू आहे. त्यांनी 132 टेस्टमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत, तर 271 वनडेमध्ये त्यांच्या नावावर 337 विकेट आहेत. याशिवाय अनिल कुंबळेने टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं. तसेच ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकदेखील होते.