Anil Ambani – उद्योगपती अनिल अंबानी यांनी शुक्रवारी ईडी चौकशीला दांडी मारली. त्यांची गुरूवारी सुमारे ९ तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, ते गैरहजर राहिले. येस बँकेशी संबंधित घोटाळ्याशी निगडीत मनी लॉण्डरिंग प्रकरणावरून अनिल अंबानी ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यांची सर्वप्रथम ऑगस्ट २०२५ मध्ये चौकशी झाली. त्यांच्या पत्नी टीना यांनाही याआधी ईडीने समन्स बजावले. मात्र, त्यांनी चौकशीसाठी नंतर बोलावण्याची विनंती केली. त्यामुळे त्या दाम्पत्याला पुन्हा समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. ईडीने नुकतीच संबंधित प्रकरणी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ३ हजार ७१६ कोटी रूपयांच्या निवासस्थानावर जप्ती आणली गेली.