MUM vs UTT : धक्कादायक! कॅच घेताना रोहितच्या साथीदाराला गंभीर दुखापत, तातडीने स्ट्रेचरवरून नेलं मैदानाबाहेर

नेमकं काय घडलं?
मुंबईने दिलेल्या ३३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तराखंडच्या डावातील ३० व्या षटकात ही घटना घडली. उत्तराखंडचा फलंदाज सौरभ रावतने स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून मिड-विकेट बाउंड्रीच्या दिशेने हवेत गेला. तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या अंगकृषने कॅच पकडण्यासाठी वेगाने धावत जाऊन डाईव्ह मारली.
🚨Angkrish Raghuvanshi rushed to hospital after he got injured while attempting for catch, Hope nothing serious 🙏
📍Jaipur
pic.twitter.com/jWlKHTWh2h— RCB (@RCBtweetzz) December 26, 2025
दुर्दैवाने, तो झेल पकडू शकला नाहीच, पण जमिनीवर आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला आणि खांद्याला जबरदस्त मार लागला. अंगकृष मैदानात वेदनेने विव्हळत असताना पाहून मुंबईचे खेळाडू आणि वैद्यकीय पथक तातडीने त्याच्याकडे धावले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी थेट हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
मुंबईची फलंदाजी आणि कामगिरी –
Angkrish Raghuvanshi is being rushed to hospital for CT Scan after he sustained head and neck injury during the game. pic.twitter.com/BDCrRCvJct
— kishor Mishra (@Kishor_Cricket) December 26, 2025
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३३१ धावांचा डोंगर उभा केला. मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद झाला, तर अंगकृष रघुवंशीलाही फलंदाजीत विशेष चमक दाखवता आली नाही; तो केवळ ११ धावा करून बाद झाला.
मात्र, त्यानंतर हार्दिक तामोरेने नाबाद ९३ धावांची खेळी करून डाव सावरला. त्याला सर्फराझ खान (५५ धावा) आणि मुशीर खान (५५ धावा) या दोन्ही भावांनी अर्धशतकी खेळी करून उत्तम साथ दिली. अंगकृषच्या दुखापतीमुळे मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, क्रिकेट चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.





