अंगणवाडी कर्मचारी संप करणार
Updated On:

नवी दिल्ली – अंगणवाडी आणि आशा या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी शुक्रवारपासून दोन दिवस संप करणार आहेत.
या काळात जेलभरो सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. या संपाला इंटक, आयटक यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
करोनाच्या काळात या कर्मचाऱ्यांना खडतर परिस्थितीत काम करावे लागत असूनही त्यांना सुरक्षितता आणि भत्ते नाहीत. त्यांच्या पगाराची बरीच थकबाकी आहे. तसेच पगार वाढीची मागणी करण्यात आली आहे.





