Andy Burnham : ॲन्डी बर्नहॅम बनणार ब्रिटनचे नवीन पंतप्रधान; लेबर पक्षाकडून नेतेपदी निवड
ब्रिटनमधील ॲन्डी बर्नहॅम (Andy Burnham) यांची लेबर पक्षाकडून नवीन नेते म्हणून औपचारिकपणे निवड करण्यात आली. ते ब्रिटनच्या नवीन सरकारचे पंतप्रधान असणार आहेत.

Andy Burnham : ब्रिटनमधील ॲन्डी बर्नहॅम (Andy Burnham) यांची लेबर पक्षाकडून नवीन नेते म्हणून औपचारिकपणे निवड करण्यात आली. ते ब्रिटनच्या नवीन सरकारचे पंतप्रधान असणार आहेत. पुढीलआठवड्यात ते विद्यमान काळजीवाहू पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या जागेवर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्डचे ५६ वर्षीय खासदार असलेल्या बर्नहॅम (Andy Burnham) हे गेल्या दशकभरातील ब्रिटनचे सातवे पंतप्रधान असणार आहेत. २०२४ मधील निवडणुकीच्यावेळी लेबर पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीची ही अखेरची संधी असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात स्टार्मर यांनी राजीनामा जाहीर केल्यापासून नेतृत्वाच्या शर्यतीत बर्नहॅम,हे एकमेव उमेदवार होते.
मी देशातील प्रत्येक प्रदेश आणि राष्ट्राचा नेता असेन. मी, किंवा, पक्ष देशहितासाठी जो निर्णय घेऊ त्याबद्दल आम्हाला कधीही खेद असणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. बर्नहॅम (Andy Burnham) यांच्या मंत्रिमंडळात लेबरपक्षातील अनुभवी नेत्यांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. त्यातही ऐक्य साधण्यासाठी सर्व गटांना सामावून घेण्याचा बर्नहॅम यांचा प्रयत्न असणार आहे, असे मानले जाते आहे.






