…अन् मला सटकन मारलं…; अभिनेत्री ईशा केसकरने सांगितला चाहत्यांचा कटू अनुभव

Isha Keskar : मराठी टेलिव्हिजनवरील अशा काही मालिका असतात, त्या प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. तसेच त्या मालिकांमधील काही लक्षवेधी पात्रंही प्रेक्षकांच्या कायम आठवणीत असतात. ‘जय मल्हार’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये साकारेल्या भूमिकांमुळे अभिनेत्री ईशा केसकर हिने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
ईशा केसकर हिला यामुळे अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकत्याच एका पॅाडकास्ट मुलाखतीमध्ये ईशाने चाहत्याचा आलेला एक कटू अनुभव सांगितला आहे. नुकतीच ईशाने ‘संपूर्ण स्वराज’ या पॉडकास्टला मुलाखत दिली.
या मुलाखतीमध्ये ईशाला तुझ्यावर सगळ्यात जास्त टीका कधी करण्यात आली? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, पहिल्या मालिकेतील दुसऱ्या बायकोला इतकं प्रेम, इतकं प्रेम आणि दुसऱ्या मालिकेतील बायकोला, रस्त्यावर दिसले की लोक डायरेक्ट फटका मारायचे. आणि म्हणायचे, तुला स्वतःच आयुष्य नाहीये का? असा एक आलेला कटू अनुभव तिने या मुलाखतीमध्ये शेअर केला.
सांगितला तो कटू अनुभव
शूटिंग संपवून ठाण्यावरून ईशा भाजीपाला घेण्यासाठी आली होती. त्यावेळीचा चाहत्याचा अनुभव तिने शेअर केला. मी शूटिंग संपवून ठाण्यावरून दमून भाजीवाला बंद होतोय म्हणून आले. त्यांना म्हटलं थांबा काका, पाच मिनिटं त्यावेळी ते काका म्हणाले अमकं निवड तिमंक निवड, त्यावेळी तिथे अचानाक एक काकू आल्या, त्यांनी मला दंडाला धरून गर्रकन फिरवलं आणि मला सटकन मला मारलं. काय गं, तुला तुझं आयुष्य नाहीये, कशाला त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतेस, असे त्या मला म्हणाल्या. मी म्हटलं काकू मला घरी जायचं आहे, असा ईशा केसरने आलेला कटू अनुभव सांगितला.
हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गावर CNG टँकरची ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराला लागली आग





