… आणि रंगोलीने केला रसभंग

कंगना राणावतला सुरुवातीला चांगले ट्विट वगैरे करत होती. इतर समाज माध्यमांवरही ती सक्रिय होती. नंतर मात्र ती संतुलन गेल्यासारखे करू लागली. त्यामुळे तिची खाती बॅन करण्यात आली. आता बऱ्याच दिवसांपासून गप्प आहे.
अगोदर तिच्याकडून केले जाणारे एन्टरटेन्मेंट मोफत असल्यामुळे लोकांनीही सुरुवातीला थोडी ढिल दिली. आता अशी बकवास कोण ऐकणार? तेही पदरमोड करून? मात्र, रंगोलीच्या दोन पावले पुढे चालणारी तिची बहीण रंगोलीही असंतुष्ट आत्मा आहे.
बॉलीवूडमध्ये कोणाचे काहीही असो आपण त्यावर बोललेच पाहिजे, अशी जबाबदारी आपल्यावर कोणीतरी टाकली असल्याचा गैरसमज तिने करून घेतला आहे. त्यातून ती अनावश्यक गोळीबार करत असते.
तापसी पन्नूबद्दल आम्ही कालच आपल्याला माहिती दिली होती. रशियात असलेल्या तापसीच्या साडीमधील लूकमुळे सध्या ती चर्चेत आहे. त्यावर रंगोलीला नाराज होण्याची वास्तविक काही गरज नव्हती.
मात्र ती झाली. तापसीने पुन्हा एकदा आपल्या बहिणीची कॉपी केली असल्याचे रंगोलीने म्हटले आहे. सोबत तिने कंगनाचे साडीतील फोटोही टाकले आहेत.
हॅन्डलूम इंडस्ट्रीला चालना मिळावी आणि महिलांना साडी नेसण्यासाठी प्रेरीत करण्याकरताच कंगना साडी नेसते असे रंगोलीचे म्हणणे आहे. मात्र, सगळ्याच बाबतीत तिची कॉपी करणाऱ्या तापसीने याबाबतही कंगनाची कॉपीच केली असल्याचेही तिचे म्हणणे आहे.
कंगनाचे हेतू उदात्त असतील तर त्यांना कोणाची काही हरकत नाही. तिने जे काही चांगले केले आहे. त्याची प्रशंसाच झाली आहे. त्यामुळेच तिच्या काही चित्रपटांना यश मिळाले आहे.
मात्र कोणी काही वेगळे केले तर रंगोलीला मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही. शिवाय साडीचे पेटंट काय कंगनाच्या नावावर आहे का?




