पुणे : …अन्‌ ‘झेड ब्रीज’वरून धावली पीएमपी (Video)

Updated On:

पुणे – मेट्रोच्या कामामुळे शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. तर, दुसऱ्या बाजूला “सुरक्षित प्रवासाची’ हमी देणाऱ्या पीएमपी बसचालकाने थेट काकासाहेब गाडगीळ पुलावरून (झेड ब्रीज) बस चालवण्याचा “स्टंट’ केला. अपुरा रस्ता आणि वळणामुळे पीएमपी अंशत: तिरकी झाली होती. सुदैवाने येथे मोठा अपघात टळला.

मेट्रोचे गर्डर बसविण्याचे काम सुरू असल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजी महाराज पुलावरील (लकडी पूल) वाहतूक बंद केली होती. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांवरून प्रवास करावा लागला. याला पीएमपीदेखील अपवाद नव्हती. टिळक चौकाकडून खंडुजीबाबा चौकाकडून ये-जा करणाऱ्या बसेस लकडी पुलावरून धावतात. मात्र, वाहतूकच बंद असल्याने पीएमपीची बस थेट “झेड ब्रीज’ वरून धावली.पीएमपीची अजब वाट “प्रभात’च्या कॅमेऱ्यात कैद झाली. अवजड वाहनांना बंदी असणाऱ्या पुलावरून थेट पीएमपी बस पुलावरून धावली. चारचाकी वाहने, टेम्पोदेखील बसपाठोपाठ धावली. पर्यायाने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

झेड ब्रीजहून डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बस वळवण्यासाठी अपुरी जागा असल्याने चालकाने कसरत करत बस वळवली. मात्र ही बस वळवताना बस दुभाजकावर चढवावी लागली. पर्यायाने बस तिरकी झाल्याने अन्य वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकला. इतकेच नव्हे तर, धोकादायक प्रवासामुळे अपघाताचा देखील धोका होता. बसमध्ये प्रवासी असताना धोकादायक “स्टंट’ करण्याची आवश्‍यकता काय, असा सवाल समाजमाध्यमांवर विचारण्यात येत आहे. काकासाहेब गाडगीळ पुलावरून (झेड ब्रीज) बस नेणे चुकीचे आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार बस पुलावरुन नेली की चालकाने स्वत: हून बस वळविली होती, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई