सलमानची प्रसिद्ध व्यक्तिरेखा चुलबूल पांडेचा दबंग आणि दबंग 2 या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता दबंग 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दबंग 3 या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू असून सलमान चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जयपूर येथे आहे. दबंग 3 या चित्रपटाच्या सेटवर सलमान चांगलाच भडकला होता त्याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या सेटवर मोबाईल बंदी असली तरी चित्रपटाच्या सेट वरील काही फोटो सोशल मिडियावर लिक होत आहेत.
या चित्रपटाबद्दल सलमानच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता असून सलमान त्याच्या फॅन्ससाठी अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पण असे असूनही चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो लीक होत आहेत. हे फोटो लीक होत असल्याने सध्या सलमान चांगलाच भडकला आहे. दबंग 3 या चित्रपटातील एक गाण्याचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. हे गाणे सलमान आणि सोनाक्षीवर चित्रीत करण्यात आले. याच गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने सलमान खूप चिडला होता. सलमानने तात्काळ चित्रपटाच्या टीमची मिटिंग घेतली आणि या पुढे चित्रपटाच्या सेटवरचे कोणतेही फोटो लीक होणार नाहीत याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. फोटो लीक होऊ नयेत यासाठी आता सेटवर कुणालाही फोन सुरू ठेवण्याची परवानगी नाहीये. तसेच सेटवरची सुरक्षा अधिक वाढवण्याबाबत सलमानने टीमला सांगितले आहे.