Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमारचे काही चित्रपट सातत्याने अपयशी ठरत आहेत. यानंतर आता लवकरच तो ‘स्काय फोर्स’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अलीकडेच त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या एका माथेफिरु चाहत्याबाबत किस्सा सांगितला आहे.
अक्षय म्हणाला की, “एका गर्दीमध्ये मी माझ्या चाहत्यांची भेट घेत होतो. तेव्हा एका चाहत्याला हात मिळवल्यावर मी दुसऱ्या एका चाहत्याला हात मिळवला. मला जाणवलं की माझा हात रक्तबंबाळ झाला. मी जेव्हा एका चाहत्याला हात मिळवला तेव्हा त्याने नखांमध्ये ब्लेडचा तुकडा लपवला होता. हेच ब्लेड माझ्या हाताला लागले आणि हातातून रक्त आलं. याची जाणीव मला थोड्या वेळाने झाली. ” Akshay Kumar |
अक्षय कुमारसह ‘स्काय फोर्स’ या सिनेमात वीर पहारिया प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षय या सिनेमात एअर फोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सारा अली खान आणि निम्रत कौर यांचीही सिनेमात प्रमुख भूमिका आहे. ‘स्काय फोर्स’ सिनेमा २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. याशिवाय अक्षय ‘भूत बंगला’ चित्रपटातही दिसणार आहे. Akshay Kumar |
हेही वाचा:
गायक दर्शन रावल अडकला विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो