Darshan Raval Wedding | गायक दर्शन रावल नुकताच धरल सुरेलियाशी लग्नबंधनात अडकला आहे. दर्शन आणि धरल अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि आता अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. दर्शनने इंस्टाग्रामवर लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.
दर्शनने फोटो शेअर करत “माय बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर”, असे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दर्शनच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. दर्शन आणि धरलने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. धरलने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तर दर्शन ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. त्यांच्या या फोटोवर कमेंट करत अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
View this post on Instagram
दर्शन रावल २०१४ मध्ये ‘इंडियाज रॉ स्टार’च्या पहिल्या सीझनमध्ये दर्शन रावल स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोने दर्शनला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्याने बॉलीवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. Darshan Raval Wedding |
‘लव्हयात्री’मधील ‘चोगाडा’ हे दर्शनचं हे गाणं खूप गाजलं होतं. यानंतर त्याने ‘शेरशाह’ मधील ‘कभी तुम्हे’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील ‘ढिंडोरा बाजे रे’ आणि इश्क विश्क रि बाउंड मधील ‘सोनी सोनी’ यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याने गुजराती गाणी देखील गायली आहेत. Darshan Raval Wedding |
हेही वाचा:
‘अरविंद केजरीवाल यांना मारण्यासाठी भाजपने पाठवले गुंड’, सीएम आतिशींचा दावा