अन् रुग्णवाहिकेला मिळाला रस्ता…

कालिकत – स्थानिक बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही परस्पर गट एकमेकांसमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र त्याच वेळी सायरन वाजवत आलेल्या रुग्णवाहिकेला, दोन्ही गटांनी मनाचा मोठेपणा दाखविताना रस्ता ताबडतोब मोकळा करून दिला. त्यामुळेच दोन्ही गटांनी चांगल्या कामासाठी काही क्षण आक्रमकपणा बाजूला ठेवल्याचे उदाहरण केरळमध्ये पाहायला मिळाले.
येथील स्थानिक बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका बंडखोर गटाने सीपीआय(एम) च्या पाठिंब्याने निवडणूक जिंकली. यावेळी विजयी आणि पराभूत असे दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही गटाचे सर्मथक आता भिडणार असे वाटत असताना, त्याचाच रस्तावरुन एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली.
यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी आपला आक्रमकपणा बाजूला ठेवून, रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता करून दिला. रुग्णवाहिका गेल्यानंतर पुन्हा वाद पेटला, व शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.





